शासकीय वसतिगृहाची प्रवर्ग निहाय आरक्षण
click here 👇 https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/201812271317271322.pdf
अक्र |
वसतीगृहाचे नांव |
वसतीगृहाचा प्रकार |
क्षमता |
स्तर |
1 |
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मा. मुलांचे बी.सी.शासकीय वसतीगृह |
बीसी वसतीगृह 2225-0281 |
७५/१२० |
तालुका, जिल्हा
विभागीय |
2 |
आर्थिक दृष्टया व मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतीगृह |
2225-0913 |
80 |
तालुका, जिल्हा
विभागीय |
3 |
100 मुलांचे/मुलींचे शासकीय वसतीगृह नविन |
2225-3342 |
100 |
तालुका, जिल्हा
विभागीय |
4 |
1000 क्षमतेचे
मुलांचे शासकीय वसतीगृहे |
2225-3342 |
1000 |
२५० विध्यार्थी मान्य संख्या प्रती वसतिगृह असे ३ मुलांचे १ मुलींचे असेएकूण ४ युनिट प्रत्येक विभागात |
5 |
मुलामुलींची निवासी शाळा |
2225-डी117 |
200 |
तालुकास्तर |
6 |
गुणवंत मुलांचे शासकीय वसतीगृहे |
2225-३३४२ |
100 |
जिल्हास्तर |
7 |
125 व्या जयंतीनिमित्त
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या वसतीगृह |
2225-३३४२ |
१०० २५० |
तालुकास्तर, जिल्हा/विभागीय |
विभागीय
स्तरावरील वसतीगृहे
अ.कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी
20 टक्के
ब.उच्च महाविद्यालयात शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी
80 टक्के
जिल्हा व तालुकास्तरावरील वसतीगृहे
अ.महाविद्यालयीन शिक्षण घेणारे
विद्यार्थ्यासाठी 60टक्के जागा राखीव ठेवण्यात आलेल्या
आहेत.
ब.माध्यमिक शाळेत शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी
40 टक्के
जागा राखीव ठेवण्यात
आलेल्या आहेत.
प्रवेशाबाबत अटी व शर्ती.
वसतिगृह प्रवेश
कोणास मिळु शकतो
( कंसातील
दिनांक शासननिर्णय व मुख्यालय परिपत्रकाच्या अनुषंगाने)
1. शासनि निर्णय 16 मे 2012 व मुख्यालय
परिपत्रक क्रमांक 2052 दिनांक 18/5/2018 नुसार सर्व शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्याच्या प्रवेशासाठी असलेल्या आरक्षणात
सुधारणा करण्यात आलेली आहे त्यानुसार खालील तक्त्यात नमुद केलेप्रमाणे प्रवर्ग निहाय
वसतिगृह प्रवेश देणे निश्चित केलेले आहे.1.परिच्छेद-1
अ.क्र |
प्रवर्ग |
आरक्षणाची टक्केवारी |
1 |
अनुसुचित जाती-SC |
80% |
2 |
अनुसुचित जमाती-ST |
3% |
3 |
विजाभज VJNT (विजा-अ-3%, भज-ब-2.5%, भज-क-3.5%, भज-ड-2% |
5% |
4 |
आर्थिक मागास
व इतर वर्गातील दारिद्र्य रेषेखालील कुंटुंबातील विद्यार्थी-EBC |
5% |
5 |
विशेष मागासवर्ग-SBC |
2% |
6 |
अपंग-Handicap |
3% |
7 |
अनाथ-Orphan |
2% |
|
एकुण |
100% |
2. परिच्छेद-2 वरिल वसतिगृहामध्ये अभ्यासक्रमनिहाय प्रवेशासाठीची टक्केवारी खालीलप्रमाणे
राहिल
अ.क्र. |
अभ्यासक्रम |
विभागीय स्तरावरिल वसतिगृहासाठी प्रवेशाची टक्केवारी |
जिल्हा स्तरावरिल वसतिगृहासाठी प्रवेशाची टक्केवारी |
तालुका स्तरावरिल वसतिगृहासाठी प्रवेशाची टक्केवारी |
1 |
कनिष्ठ महाविद्यालय |
15% |
20% |
20% |
2 |
व्यावसायिक
महाविद्यालय |
70% |
25% |
20% |
3 |
बिगर व्यावसायिक
वरिष्ठ महाविद्यालय |
15% |
25% |
20% |
4 |
विद्यालय विभाग |
0% |
30% |
40% |
|
एकुण |
100% |
100% |
100% |
3. सन 2003 मध्ये इयत्ता 10 मध्ये
75 टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणा-या गुणवंत विद्यार्थ्यास
इयत्ता 11 वी, डिप्लोमा-प्रथम, आयटीआय या गुणवत्ताधारक
विद्यार्थ्याना 28 गुणवंत वसतिगृहात प्रवेश
दिला जातो त्यामुळे परिछेद 2 मधील अभ्यासक्रमनिहाय प्रवेशासाठीची टक्केवारी लागु राहणार
नाही सदर गुणवंत वसतिगृहाचे प्रवेश हे शासन निर्णय 17 जुन 2003 व त्यामध्ये वेळोवेळी केलेल्या सुधारणा नुसार
होतील तथापि परिच्छेद-1 मधील आरक्षणाप्रमाणे प्रवर्गनिहाय टक्केवारी राहिल.
4. अनुसुचित जातीसाठी राखीव ठेवलेल्या जागांपैकी महापालिका क्षेत्रात व अ-वर्ग नगरपालिका
क्षेत्रात-14% जागा मांग भंगी व मेहत्तर जातीसाठी ( मांग जातीसाठी 7% व मेहत्तर जातीसाठी 7% ) आणि जिल्हा व तालुका पातीवर मांग व मेहत्तर जातीसाठी 10% जागा ( मांग जातीसाठी 5% व मेहत्तर
जातीसाठी 5% ) राखीव
ठेवण्यात याव्यात.
पुरेसे अर्ज उपलब्ध न झाल्यास खालील प्राधान्याने अनु जाती जमातीच्या
प्रतिक्षा यादीमधून भरण्यात येतील
प्रथमप्राधान्य- मांग
व भंगी (सदर अर्ज उपलब्ध नसल्यास खालील
प्रमाणे)
त्यानंतर कोणत्याही जातीच्या जागा शिल्लक राहील्यास त्या फक्त अनु जाती मधुनच
भरण्यात येतील
शासकीय वसतीगृह प्रवेश प्रक्रीया राबविताना अनु जाती प्रवर्गासाठीनिश्चीत केलेल्या आरक्षणामध्ये कोणताही बदल न करता या केवळ अनुसुचीत जाती प्रवर्गामधुनच भरण्यात याव्यात अनु सुचीत प्रवर्गाच्या जागा इतर प्रवर्गासाठी रुपांतरीत करता येणार नाहीत परंतु इतर प्रवर्गासाठी निश्चीत केलेल्न्या 20 टकक्या मध्ये त्या प्रवर्गाचे विद्यार्थी उपलब्ध न झाल्यास त्या जागा अनुसुचित जातीच्या प्रवर्गातुनच परावर्तनाने भरता येतील (शानि
क्र बीसीएच-201८/प्र.क्र.31 शि क्षण -2दि 21 डिसेंबर 2018 )
5.
28 गुणवंत शासकिय वसतिगृह प्रवेशाबाबत खासबाब लागू राहणार या जागासाठी
प्राप्त
झालेल्या
अर्जानुसार गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात यावा
6. वसतिगृहाची प्रवेश यादी जिल्हा प्रवेश समिती सर्व अर्ज विचारात घेवुन तयार
करतील त्या यादीस अंतिम मान्यता देण्याचे अधिकार जिल्हा संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांना आहेत.
7. वरिल प्रमाणे दिलेला वसतिगृह प्रवेश पुढील वर्षी चालु ठेवावा.( शासन
निर्णय 16 मे 1984 )
8. विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे बंधनकारक आहे. ( शासन निर्णय 16 मे 1984 )
9. नविन प्रवेशाच्या वेळी प्रवेश घेणारा विद्यार्थी हा कोणत्याही अभ्यासक्रमाच्या
पहिल्या वर्षाला प्रवेशित असावा ( शासन निर्णय 16 मे 1984 )
10. उत्पन्न व जातीचे प्रमाणपत्र रहिवाशी प्रमाणपत्र हे तहसिलदार किंवा प्रांत
अधिकारी यांचे स्वाक्षरीचे असावे.
११.स्थानिक
विद्यार्थी नसावा म्हणजे ज्या वसतीगृहात प्रवेश अर्ज करावयाचा आहे. त्या
शहराच्या/महानगरपालीकाहद्द/गावाची हद्द येथे पालकाचे घरी राहून अभ्यासक्रम पुर्ण
केला आहे अशा विद्यार्थ्यास प्रवेश
मिळणार नाही.
१२. जे अनु.जाती/जमाती,
विमुक्त जाती
व भटक्या जमातीपैकी व आर्थिक दृष्टया मागासलेले, इमाव , अपंग व
अनाथ आहेत यांना प्रवेश देय आहे.
१३. कोणत्याही प्रथम वर्षात प्रवेश घेवु शकतात.
१४. प्रवेश पध्दत मेरीट नुसार व जातनिहाय 30 टक्के पेक्षा जास्त नसावा.
१५. ज्या शहरातील वसतीगृहात प्रवेश असेल तेथीलच
शाळा/महाविदयालय प्रवेश असावा.
16.प्रवेश घेता वेळी सरकारी रुग्णालयाचे वैदयकीय
पात्रता प्रमाणपत्र सादर करावे.
१७.प्रवेशाच्या
वेळी राष्ट्रीयकृत बॅकेचे खाते उघडल्याची छायांकीत प्रत.
1८. शासकिय
वसतिगृहात व्यावसायिक प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यास एकदाच प्रवेश मिळेल.
( उदा. डी.एड्. नंतर प्रथम वर्ष पदवी महाविद्यालय विभागासाठी )
19. प्रवेश
घेते वेळी प्रवेशीतास सर्व कागदपत्रे आधारकार्ड,पॅनकार्ड, मार्कमेमो,रहीवासी
प्रमाणपत्र स्थानि क पालकाचे मोबाईल क्रमांक देणे बंधनकारक आहे
शासकिय वसतिगृहात कोणास प्रवेश देता येणार
नाही.
1. मध्यंतरीच्या वर्गात शिकणा-याला प्रवेश मिळणार नाही. ( शासन निर्णय 16 मे 1984 )
२. विद्यार्थी पुर्णवेळ वा अर्धवेळ
वा रोजंदारीवर नोकरी करीत असेल ( शासन निर्णय 16 मे
1984 )
३. विद्यार्थी नापास झाला असेल किंवा परीक्षेस बसला नसेल तर ( शासन निर्णय 16 मे 1984 )
४. वैद्यकिय
व आभियांत्रिकी अभ्यासक्रमांत नापास झाल्यावर एकवेळ लाभ घेतला असेल तर
( शासन निर्णय 16 मे 1984 )
५. मागील
वर्षाच्या वागणुकीबाबत वाईट शेरा असल्यास ( शासन निर्णय
16 मे 1984 )
६. पालक
स्थानिक असल्यास.
७. अर्जातील
माहिती खोटी आढळल्यास ( शासन निर्णय 16 मे 1984 )
८. उत्पन्नाची
मर्यादा जादा गेल्यास ( शासन निर्णय 16 मे 1984 )
९. भारत
सरकार शिष्यवृत्तीप्रमाणे मर्यादा पेक्षा ज्यांचे उत्पन्न रुपये सुधारित शासननिर्णयाप्रमाणे
जास्त
असल्यास.
१०. विभागीय वसतीगृहात शालेय
अभ्यासक्रमाच्या मुलामुलींना प्रवेश देता
येणार नाही
११. मध्यंतरीच्या वर्गात शिकत असलेले
मुलामुलींना कोणत्याही वसतीगृहात प्रवेश मिळणार नाही.
१२.अनुजातीच्या जागापैकी मांग व भंगी जातीच्या
मुलामुलींसाठी जागा राखुन ठेवण्यात याव्यात.
विशेष दक्षता :-
1. उत्पनाचे प्रमाणपत्र हे तहसिलदारानेच दिलेले असावे ( शासन निर्णय 16 मे 1984 )
2. आठव्या वर्गाखाली विद्यार्थ्यास प्रवेश देण्यात येउ नये
3. जुन्या विद्यार्थ्याना पुर्नप्रवेशावेळी उत्पनाच्या प्रमाणपत्राची गरज नाही. ( शानि 17 जुन 84 )
4. विना अनुदान तत्वावरिल वैद्यकिय व अभियांत्रिकी तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या
विद्यार्थ्याना
प्रवेश देण्यात यावा ( शानि 17 जुन
84 )
5. कोणतेही कारण नसताना परिक्षेस न बसणे वा नापास होणे
अशावेळी प्रवेश देता येणार नाहि
( शानि
17 जुन 84 )
6. महाविद्यालयीन विद्यार्थ्याचे अर्ज पुरेसे नसतील तर शालेय विद्यार्थ्याचे अर्जाचा
विचार करुन
1 वर्षाकरिता
प्रवेश द्यावा. व शालेय अर्ज पुरेसे नसल्यास महाविद्यालय अर्जाचा
1 वर्षाकरिता
विचार करावा पण प्रत्यक्षात
जातीवार टक्केवारी तंतोतंत पाळावी ( शानि 17 जुन 84 )
7. प्रवेशास कोणाही पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यास भारत सरकार शिष्यवृत्तीचे
अनुदान
पुर्णदराने
दिले गेले नाही हे महाविद्यालयाकडून खात्री करुन घ्यावी
( 1/3 शिष्यवृतती देय राहिल )
8. तंत्रनिकेतन शाखेच्या विद्यार्थ्याना त्यांचे संपुर्ण अभ्यासक्रमांत किंवा
एकदा नापास झाल्यास
त्यांचा प्रवेश पुढे चालु राहिल.
शासन निर्णय क्रमांक
बीसीएच्-2018/प्र.क्र.319/शिक्षण-2/मत्रालय विस्तारभ्वन मुंबई-32
दिनांक 21 डिसेंबर, 2018 नुसार परिवर्तनाने प्रवेश बंद करण्यात
आलेला आहे
ऑनलाईन प्रवेशप्रक्रीया
सर्व मागासवर्गीय
मुलामुलींना वसतीगृहाचे अर्ज एकाच ठिकाणावरुन भरता यावे या साठी महाराष्ट्र शासना मार्फत वेळो वेळी प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने स्वीकारण्यात येतात संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शक सुचना वेळोवेळी दिल्या जातात आपले सरकार या
वेब पोर्टलवर प्रवेश अर्ज मोफत भरता येईल . प्रत्यक्ष प्रवेश घेते वेळी मार्क मेमो, उत्पनाचा दाखला,
जातीचे प्रमाणपत्र बोनाफाईड प्रमाणपत्र राष्ट्रीयकृत बँकेचे खाते आधार क्रमांक पॅन क्रमांक वैद्यकीयफिटनेस
प्रमाणपत्र इ कागदपत्रे वसतीगृहामध्ये जमा करणे आवश्यक आहेत.
खास बाब प्रवेश
वेळोवेळी निर्गमित
केलेले शासन निर्णय तसेच सुधारीत शासन निर्णयान्वये रिक्त जागेच्या 15टक्के जागा हया खास
बाब म्हणून भरण्यात येतात खासबाब म्हणजे जो विद्यार्थी दारीद्ररेषे खालील आहे .अशा
विद्यार्थ्यास या खासबाब अंतर्गत कोणत्याही वसतीगृहात कोणत्याही वर्गासाठी कोणत्याही जातीसाठी प्रवेश अर्ज भरता येतो. यामध्ये 10 टक्के (मंत्रालयीन
स्तर) व 3 टक्के अपंग 2 टक्के अनाथ (संबंधित सहायक आयुक्त स्तर) विद्यार्थ्यास जागा राखीव ठेवल्या
आहेत. (शासननिर्णय
क्रमांक बीसीएच/2015/प्र.क्र.-11/शीक्षण-2दि 18 जुन 2015)
![]() |

No comments: